Navratri 2024 Shailputri Devi: आजची पहिली माळ रंग पिवळा, जाणून घ्या कोण होती देवी शैलपुत्री...

Navratri 2024 Shailputri Devi: आजची पहिली माळ रंग पिवळा, जाणून घ्या कोण होती देवी शैलपुत्री...

नवदुर्गेतील देवीच्या पहिल्या अवताराची म्हणजेच देवी शैलपुत्री माहिती काही लोकानांच माहित असेल, कोण होती देवी शैलपुत्री जाणून घ्या...
Published by :
Team Lokshahi
Published on

आज गुरुवार ३ ऑक्टोबर आजपासून अश्विन शुक्ल प्रतिपदा, शारदीय नवरात्री सुरू होत आहे. सकाळी ६ वाजून ७ मिनिटे ते ९ वाजून ३० मिनिटापर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येणार आहे. आज नवरात्रीची पहिली माळ आहे आणि आजचा पहिला रंग पिवळा आहे, म्हणून या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता. नवदुर्गेमध्ये देवीचे पहिले रुप देवी शैलपुत्री आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. नवदुर्गेतील देवीच्या पहिल्या अवताराची म्हणजेच देवी शैलपुत्री माहिती काही लोकानांच माहित असेल, कोण होती देवी शैलपुत्री जाणून घ्या...

नवदुर्गांपैकी दुर्गेचे पहिले रूप म्हणून देवी शैलीपुत्रीला ओळखले जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. शैलपुत्री देवीच्या कपाळावर अर्ध चंद्र आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीचे वाहन नंदी आहे त्यामुळे शैलपुत्री देवीला वृषभारुढा तसेच या देवीला उमा असे देखील म्हटले जाते. कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता निसर्ग स्वरूपा देवी आहे आणि ती सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे. पहिल्याच दिवसापासून संत-महंत त्यांच्या योग साधनेला सुरवात करतात. शैलपुत्रीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.

शैलपुत्री देवीचा मंत्र :

या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:।

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com